Viral Video | ‘बेबी पंच’ ने बाहुलीतच शोधली ‘आईची माया’, जपानमधील माकड सोशल मिडीयावर का ठरले ‘इमोशन’ : काय आहे Inside Story
आईची माया किती महत्वाची हे अधोरेखित : प्राणिसंग्राहालयात पंच ला पाहण्यासाठी तुफान गर्दी, अनेकांना केले भावूक
जपानच्या इचिकावा सिटी प्राणिसंग्रहालयातील ‘बेबी पंच’ या माकडाने सोशल मिडीयावर अनेकांना भाऊक केले आहे. हे पंच केवळ सात महिन्याचा आहे त्याचा जन्म झाला त्यावेळी काही अनाकलनीय कारणांनी त्याच्या आईने त्याला नाकारले. तज्ज्ञांच्या मते, प्रचंड उष्णता आणि पहिल्या बाळंतपणामुळे आलेला ताण यामुळे त्या माकडिनीने आपल्या पिल्लाला दूर लोटले.
त्यानंतर प्राणीसंग्रहालयातील केअर टेकर्सनी एक छोटी माकडाची बाहूली पंचला खेळण्यासाठी दिली. पण आईच्या मायेला पोरका झालेल्या पंच ने त्या बाहूलीतच आपली आईची माया शोधली. तो रात्रंदिवस या बाहूलीबरोबर खेळतो, राहतो, झोपतो. याची ही कहानी पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटून येत आहेत. आईची माया किती महत्वाची असते या गोष्टीतून केले अधोरेखीत झाले आहे. जगभरातील मिडीयाने या गोष्टीची दखल घेतली आहे. आता या माकडाला पाहण्यासाठी इचिकावा सिटी प्राणिसंग्रहालयातील लोकांची झुंबड उडाली आहे.
या पंचचा जन्म जुलै 2025 मध्ये या प्राणिसंग्रहालयात झाला. त्यावेळी त्याच्या आईने त्याला नाकारले जवळ घेण्यास नकार दिला यावेळी प्रशासनाला या लहान पिलाच्या संगोपनाचा प्रश्न पडला, त्यावेळी त्यांनी एक स्फॉप्ट टॉय त्या पिलाला दिले त्याने सुरवातील ते स्वीकारण्यास नकार दिला पण हळू हळू या माकडने ही बाहूली स्वीकारली, त्याचा एवढा लळा लागला की त्याने आपले सर्स्वस्वच त्या बाहूलीत पाहिले.
बाहुली झाली ‘आई’
माकडाची पिल्ले निसर्गतःच आपल्या आईच्या अंगावरील केसांना घट्ट पकडून राहतात, ज्यामुळे त्यांना सुरक्षित वाटते. पंचला हा आधार मिळत नसल्याने तो खूप अस्वस्थ होता. तेव्हा प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी त्याला IKEA या कंपनीची एक केशरी रंगाची ओरांगउटान ची खेळण्याची बाहुली पंचला दिली.या बाहुलीचे केस लांब असल्याने पंचला तिला पकडणे सोपे झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पंचने त्या बाहुलीलाच आपली आई मानले. तो दिवसभर तिला आपल्यासोबत ओढत नेतो, तिच्या कुशीत झोपतो आणि घाबरला की तिच्या मागे जाऊन लपतो. नेटकऱ्यांनी या बाहुलीला ‘ओरा-ममा’ (Ora-mama) असे नाव दिले आहे.
नेटकरी होताहेत भावूक
काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये कळपातील इतर माकडांनी पंचला त्रास दिला होता. त्यावेळेस तो धावत जाऊन आपल्या बाहुलीला बिलगला. हा व्हिडिओ पाहून जगभरातील नेटकरी भावूक झाले होते. आनंदाची बातमी ही आहे की, पंच आता हळूहळू त्याच्या खऱ्या कळपात मिसळण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडच्या काही व्हिडिओंमध्ये कळपातील एका वरिष्ठ माकडाने पंचला जवळ घेतले आहे. जरी तो अजूनही आपल्या लाडक्या बाहुलीला सोडायला तयार नसला, तरी तो आता एकटा नाही.

