आमच्याबद्दल – नवकोकण टाईम्स

कोकणाच्या मातीशी नातं जपणारी वस्तुनिष्ठ पत्रकारिता

आमची ओळख

नवकोकण टाईम्स हे कोकण व महाराष्ट्रातील राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक आणि सामाजिक वैभव वस्तुनिष्ठ व सकारात्मक पद्धतीने मांडणारे डिजिटल न्यूज माध्यम आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांत सलग १६ वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर स्थिरावण्याऐवजी, कोकणासाठी आणि कोकणी माणसासाठी नव्या धडपडीची सुरुवात करण्यात आली आहे.

चॅनेलचा उद्देश

कोकणातील प्रश्न, संधी, संस्कृती, इतिहास व सामाजिक वास्तव हे प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे मांडणे हेच नवकोकण टाईम्सचे प्रमुख ध्येय आहे. सरळ, साध्या, माणुसकी जपणाऱ्या कोकणी बांधवांसाठी हे माध्यम समर्पित आहे.

kokan-beach

कोकणची संस्कृती व वैशिष्ट्य

अरबी समुद्र व सह्याद्रीच्या मधील चिंचोळ्या पट्ट्यात वसलेला कोकण हा भगवान परशुरामांची भूमी म्हणून ओळखला जातो.

जैवविविधता

निसर्गसंपन्न वनस्पती व जीवसृष्टी

नैसर्गिक पर्यावरण

शुद्ध, शांत आणि अल्हाददायक परिसर

लोकजीवन व परंपरा

साधेपणा, माणुसकी, संस्कारांची परंपरा

बोलीभाषा व जीवनशैली

खानपान, भाषा, वेगळी संस्कृती

कोकण – आमचा अभिमान

कोकण ही केवळ भौगोलिक रचना नसून ती संस्कृती, इतिहास आणि माणुसकीची एक समृद्ध ओळख आहे. अरबी समुद्र व सह्याद्री पर्वतरांगांच्या सान्निध्यात वसलेली ही भूमी नैसर्गिक सौंदर्याबरोबरच आपल्या मानवी मूल्यांमुळेही ओळखली जाते.कोकण ही एक रत्नभूमी आहे. या भूमीत अनेक महान व्यक्तिमत्त्वे घडली असून त्यांनी आपल्या कार्यातून समाजजीवन समृद्ध केले आहे. बदलत्या काळात कोकणाने देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले असून विविध क्षेत्रांत आपली वेगळी छाप उमटवली आहे. ही परंपरा, ओळख आणि हा वारसा जपणे हाच कोकणचा खरा अभिमान आहे.

विकासाची दृष्टी

गेल्या पंच्याहत्तर वर्षांत कोकणाच्या पर्यटन विकासाबाबत मोठी स्वप्ने पाहिली गेली. परंतु आता घोषणा नव्हे, प्रत्यक्ष कृती आवश्यक आहेपर्यटन, फळ लागवड, मत्स्यशेती, रोजगार निर्मिती या सर्व संधी अधिक व्यापक करण्यासाठी दीर्घकालीन धोरण राबवणे गरजेचे आहे.

शेती व फळ लागवडीला चालना

कोकणातील पारंपरिक शेती व फळबागांना पर्यटनाशी जोडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न.

मत्स्यव्यवसाय व सागरी अर्थव्यवस्था

कोकणातील पारंपरिक शेती व फळबागांना पर्यटनाशी जोडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न.

स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती

पर्यटन, सेवा उद्योग व स्थानिक उपक्रमांमधून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे.

ग्रामीण व सांस्कृतिक पर्यटनाचा विकास

ग्रामीण जीवनशैली, सण-परंपरा व खानपान यांच्या माध्यमातून कोकणाची वेगळी ओळख जगासमोर मांडणे.

पायाभूत सुविधा व भविष्यातील दिशा

हे प्रकल्प कोकण पर्यटनाच्या दृष्टीने आगामी दशकात मोठे बदल घडवून आणू शकतात. परंतु यासाठी जबाबदार नेतृत्व व सातत्यपूर्ण पाठपुरावा आवश्यक आहे.

costal way

कोकणच्या विकासाचा आणि
संस्कृतीचा भाग बना

कोकणातील विकास, पर्यटन, संस्कृती आणि लोकजीवनाशी संबंधित
सत्य व सकारात्मक बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.
कोकणाच्या भविष्य घडणीसाठी माहितीपूर्ण आणि जबाबदार पत्रकारितेला साथ द्या.