आंतरराष्ट्रीय

Tech Companies: इराणच्या धमकीमुळे अमेरिका टेन्शनमध्ये; ॲपल आणि मायक्रोसॉफ्टसह 18 प्रमुख कंपन्यांवर हल्ला करणार

Iran Threatens US Tech Companies: मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना इराणने अमेरिकेच्या मोठ्या टेक कंपन्यांना थेट धमकी दिली आहे. Apple, Google, Microsoftसह 18 कंपन्या टार्गेटवर आहेत.

Iran Threatens US Tech Companies: मध्यपूर्वेतील तणाव आता आणखी तीव्र झाला असून इराणकडून मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांना थेट इशारा देण्यात आला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने Meta Platforms, Google आणि Apple सारख्या कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.

‘ऑफिस रिकामे करा’… कर्मचाऱ्यांना इशारा

इराणच्या सरकारी माध्यमांद्वारे दिलेल्या माहितीनुसार, या कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीने परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. 1 एप्रिल रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून या कंपन्यांवर कारवाई सुरू होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

मोठ्या कंपन्या टार्गेटवर

IRGC ने पारंपरिक लष्करी ठिकाणांऐवजी थेट टेक्नॉलॉजी कंपन्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे. यामध्ये Microsoft, Intel, NVIDIA, Oracle Corporation, तसेच Tesla Inc. आणि Boeing यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांवर AI आणि हाय-टेक वॉरफेअरमध्ये सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

AI आणि हाय-टेक युद्धावरून वाद

इराणचा दावा आहे की, या कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून टार्गेट ओळखण्यात मदत करत आहेत. त्यामुळेच आता या कंपन्यांना टार्गेट केलं जाईल, असं IRGC ने स्पष्ट केलं आहे.

तणाव आणखी वाढण्याची शक्यता

इराणने स्पष्ट केलं की, जर आणखी कोणत्याही इराणी नेत्यावर हल्ले झाले, तर या धमक्या प्रत्यक्ष कारवाईत बदलू शकतात. यामुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या मध्यपूर्वेत परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. हा संघर्ष आता पारंपरिक युद्धाच्या चौकटीत मर्यादित न राहता टेक्नॉलॉजी आणि AI क्षेत्रापर्यंत पोहोचला आहे.

जगातील मोठ्या टेक कंपन्यांना थेट धमक्या मिळणं ही गंभीर बाब असून, याचा जागतिक अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो.

One thought on “Tech Companies: इराणच्या धमकीमुळे अमेरिका टेन्शनमध्ये; ॲपल आणि मायक्रोसॉफ्टसह 18 प्रमुख कंपन्यांवर हल्ला करणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *