दापोली किनाऱ्यावर ‘ऑलिव्ह रिडले’ कासव संरक्षणासाठी प्रशासनाचे कडक निर्बंध
दाभोळपासून केळशीपर्यंतच्या किनाऱ्यांवर कासवांच्या प्रजनन काळात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून प्रखर दिवे, ध्वनी प्रदूषण आणि प्लास्टिक कचऱ्याबाबत जिल्हा प्रशासनाने कडक नियमावली जारी केली आहे.
दापोली : कोकणच्या निसर्गसंपन्न किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या दुर्मिळ ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्री कासवांच्या संरक्षणासाठी दापोली प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. कासवांच्या प्रजनन कालावधीत त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी विशेष आदेश जारी करून किनाऱ्यांवर विविध निर्बंध लागू केले आहेत. पर्यावरण संवर्धनाबरोबरच निसर्ग पर्यटनाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ही उपाययोजना महत्त्वाची मानली जात आहे.

