कोकणवासीयांसाठी गुड न्यूज! ‘या’ स्पेशल ट्रेनच्या फेऱ्यांत वाढ; आता १२ फेब्रुवारीपर्यंत प्रवास सुखकर होणार
कोकण रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते करमळी विशेष गाडीच्या सेवेला १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे मुंबईहून कोकण, गोव्याला जाणाऱ्यांना दिलासा मिळालाय.
कोकण रेल्वेचा मोठा निर्णय! ‘या’ मार्गावरील प्रवाशांची लॉटरी
मुंबई : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांची वाढती गर्दी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते करमळी या विशेष रेल्वेगाडीच्या कालावधीत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
पीक विम्याचे 17,500 रुपये कधी मिळणार? कोण पात्र ठरणार?
मुंबई : 2025 च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक जिल्ह्यांमध्ये पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांची मेहनत आणि संपूर्ण नियोजन पाण्यात गेले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुमारे 31 हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली होती. या पॅकेजअंतर्गत पीक विमा योजनेतून प्रति हेक्टर 17,500 रुपये मदत देण्याचे सांगण्यात आले. मात्र, ही रक्कम सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळणार नसून, ती महसूल मंडळनिहाय पीक कापणी प्रयोगांवर आधारित असणार आहे. त्यामुळे जाहीर केलेली मदत प्रत्येक शेतकऱ्याला मिळेलच, याची हमी देता येत नाही.

