विश्वासंचार

Blood Moon : आकाशात दिसणार ‌‘ब्लड मून‌’चा नजारा!

Blood Moon : आकाशात दिसणार ‌‘ब्लड मून‌’चा नजारा!

नवी दिल्ली : खगोलप्रेमींसाठी 2026 सालातील एक मोठी पर्वणी चालून आली आहे. येत्या 3 मार्चला आकाशात ‌‘पूर्ण चंद्रग््राहण‌’ पाहायला मिळणार आहे. या विशेष खगोलीय घटनेला सामान्य भाषेत ‌‘ब्लड मून‌’ असेही म्हटले जाते. कारण, ग््राहणाच्या वेळी चंद्र तांबूस किंवा गडद लाल रंगाचा दिसतो.

जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वी सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखते, तेव्हा चंद्रग््राहण होते. नासाच्या शास्त्रज्ञांनुसार, पृथ्वीच्या वातावरणामुळे सूर्यप्रकाशातील निळ्या रंगाच्या लहरी विखुरल्या जातात आणि फक्त लाल रंगाच्या लहरी पुढे सरकतात. हीच लाल प्रकाशकिरणे चंद्रावर पडल्यामुळे तो तांबूस रंगाचा दिसतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाश लाल दिसण्यामागेही हेच वैज्ञानिक कारण आहे. पूर्ण चंद्रग््राहण तेव्हाच होते जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अचूक रेषेत असतात. अम्बा (Umbra): हा पृथ्वीच्या सावलीचा सर्वात गडद भाग असतो. जेव्हा चंद्र या भागात प्रवेश करतो, तेव्हा तो पूर्णपणे लाल दिसू लागतो.

पेनुम्बा (Penumbra) : ग््राहणाच्या सुरुवातीला चंद्र या भागात असतो, जिथे त्याचा प्रकाश थोडा कमी होतो, पण रंग बदलत नाही. 3 मार्चचे हे पूर्ण चंद्रग््राहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांतून दिसणार आहे. युरोप आणि आफ्रिकेतील काही भागांत ते पूर्णपणे दिसणार नाही. विशेष म्हणजे, 2026 मधील हे एकमेव पूर्ण चंद्रग््राहण असून, यानंतर अशी संधी थेट 2028 च्या शेवटी मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *