एक खासदार निवडून नाही आली तर… नवनीत राणा आणि खासदार अनिल बोंडे यांची भरसभेत जुंपली, अमरावतीत मोठी खळबळ
अमरावती महानगरपालिकेत मित्रपक्षातच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. रवी राणा-नवनीत राणा विरुद्ध भाजप असा सामना इथं रंगला आहे. युवा स्वाभिमानी पक्ष आणि भाजपमध्ये महापालिकेत काही ठिकाणी युती तर काही प्रभागात सामना पाहायला मिळत आहे. त्यातून दोघांमध्ये सामना रंगला आहे.
अमरावतीत सध्या मित्रांमध्ये जुंपली आहे. काही प्रभागात नवनीत राणा या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या तर काही प्रभागात चक्क भाजपच्या उमेदवारा विरोधात पती-पत्नीने प्रचाराचा धुराळा उडवल्याने एकच खळबळ उडाली आहे.त्यावरून खासदार अनिल बोंडे यांनी कानपिचक्या दिल्यानंतर आता नवनीत राणा भडकल्या आहेत. भर प्रचार सभेत या दुखण्याचे प्रदर्शन मतदारांनाच नाही तर कार्यकर्त्यांना पाहायला मिळाले. त्यामुळे नवनीत राणा विरुद्ध सर्व इतरमध्ये भाजपमधील एक गट सक्रिय असल्याचे दिसून आले. अमरावतीत या धुमश्चक्रीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

