Yash Toxic Teaser Released : रॉकिंग स्टार यशच्या 40 व्या वाढदिवशी रयाची एन्ट्री!
Yash Toxic Teaser Released : KGF सिनेमानंतर त्याच्या ‘टॉक्सिक’ सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे. यश चाहत्यांना भेटला नसला तरी, त्याने ‘टॉक्सिक’च्या माध्यमातून लोकांना सरप्राईज दिले आहे.
‘टॉक्सिक’ टीझर, यशच्या कॅरेक्टरचा खुलासा
यंदा यशच्या वाढदिवशी टॉक्सिकच्या टीमकडून मोठी भेट मिळाली आहे. ‘रया’ या पात्राची ओळख करून देण्यात आली आहे. आज सकाळी 10:10 वाजता टीमने यशच्या पात्राचा लूक रिलीज केला. यश मास आणि स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
टॉक्सिक व्हिडिओमध्ये काय?
हा चित्रपट अगदी हॉलिवूड चित्रपटासारखा दिसतो, त्यातही यश सिक्स पॅकमध्ये जबरदस्त दिसत आहे. ‘रया’च्या भूमिकेत तो गुंडांना मारहाण करतानाच्या दृश्यात दिसला आहे. ‘डॅडी इज होम’ असा एकच डायलॉग त्याने म्हटला आहे.

