कोकण विशेष

७/१२ उताऱ्यावरील ‘भोगवटादार वर्ग-२’ म्हणजे काय? जमीन खरेदीपूर्वी ही एक नोंद तपासा, नाहीतर बसू शकतो मोठा फटका!

Bhogvatadar Class-2 Land Meaning : भोगवटादार वर्ग-2 ही एक नियंत्रित भूधारणा पद्धत आहे, ज्यामध्ये जमिनीच्या खरेदी-विक्री, हस्तांतरणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. या जमिनींवर शासनाचे थेट नियंत्रण असते, त्या “प्रतिबंधित” म्हणून ओळखल्या जातात. 
भोगवटादार वर्ग-2 जमीन म्हणजे काय?

मुंबई : शेतजमिनीची खरेदी-विक्री, वारसा हक्क, कर्ज प्रकरणे, सरकारी योजना तसेच विविध कायदेशीर व्यवहारांसाठी सातबारा उतारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. मात्र सातबाऱ्यावर नमूद असलेली “भोगवटादार वर्ग-2” ही नोंद नेमकी काय दर्शवते, याबाबत अनेक शेतकरी आणि जमीनधारकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. भोगवटादार वर्ग-2 म्हणजे काय, या वर्गात कोणत्या जमिनी येतात आणि या जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करता येतात का, हे समजून घेणे आजच्या काळात फार आवश्यक ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *